युवा हिंदू प्रतिष्ठानकडून बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराचा निषेध व घुसखोरांवर कारवाईची मागणी

खामगाव : सकल हिंदू समाज व युवा हिंदू प्रतिष्ठाण महाराष्ट्र यांच्या वतीने आज २६ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसुल) यांना निवेदन देण्यात आले.

खामगाव : सकल हिंदू समाज व युवा हिंदू प्रतिष्ठाण महाराष्ट्र यांच्या वतीने आज २६ डिसेंबर रोजी उपविभागीय अधिकारी (महसुल) यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये अशा आशयाचे नमुद केले आहे की, बांगलादेशात हिंदूवर अत्याचार होत असुन दिपूचंद्र दास या युवकाची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या कृत्यामुळे हिंदू समाजबांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे हिंदूंचे रक्षण करण्यासाठी भारत सरकारने ठोस पावले उचलावी. बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करण्यात यावी. तसेच दिपूचंद्र दास यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रोहित पगारिया, योगेश डोईफोडे, मनिष छापरवाल, रविराज पाटील, विनायक निमसे, अमोलसिंह चंदेल, राहुल कळमकार आर्दिच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »