मलकापूर :नळगंगा नदी पात्रात बुडाल्याने दाताळा येथील २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ ऑगस्ट सकाळी उघडकीस आली. गणेश रामभाऊ पठाडे असे मृतक युवकाचे नाव आहे.

मलकापूर :नळगंगा नदी पात्रात बुडाल्याने दाताळा येथील २७ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ५ ऑगस्ट सकाळी उघडकीस आली. गणेश रामभाऊ पठाडे असे मृतक युवकाचे नाव आहे.
दाताळा येथील गणेश पठाडे हा मंगळवारी सकाळी शेतात जात असल्याचे सांगून घरून निघून गेला होता. बराच वेळ झाल्यानंतरही तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी शोध घेतला. परिसरात कुठेही न आढळल्याने नळगंगा नदीच्या पात्रात गणेश बुडाल्याची शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली. त्यानुसार नदीच्या पात्रात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह नदीपात्राच्या बाहेर काढून पंचनाम केला आहे. तसेच उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत. या घटनेने दाताळा गावात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश पठाडे याच्या निधनाने त्याच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.