छत्रपती संभाजीनगर : आजच्या धावपळीच्या जीवनात आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी योगा करणे गरजेचे आहे. योगा हे सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून अंगीकारावा असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या कार्यक्रमात शनिवार, 21 जून रोजी केले.

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने बीबी का मकबरा परिसरात शनिवारी सकाळी योग उपक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास खा. डॉ. भागवत कराड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पुरातत्व विभागाचे एस. के. भगत, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्यासह विविध योग संस्थेचे प्रतिनिधी,महानगरपालिका व विविध विभागाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते.
डॉ .भागवत कराड म्हणाले की, योग ही आपल्या संस्कृती भाग आहे. सर्व अर्थानी योग ही आरोग्यासाठी महत्वपूर्ण असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून सार्वजनिक स्वरूपात योग दिनानिमित्त अकरा वर्षापासून सुरु आहे. समाजाचा आरोग्याचा विचार करून तो कायम वृद्धिंगत राहो.