जालना शहर महापालिकेत महिला राज; भाजपचाच होणार पहिला महापौर

जालना : शहर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर गुरुवार, 22 जानेवारी रोजी महापौर पदासाठी निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये पहिला महापौर होण्याचा मान हा महिलेला मिळाला आहे. या आरक्षण सोडतीमध्ये जालन्याचे महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे शहर महानगरपालिकेत आता महिला राज पहायला मिळणार असून पहिल्या महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जालना : शहर महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडल्यानंतर गुरुवार, 22 जानेवारी रोजी महापौर पदासाठी निघालेल्या आरक्षण सोडतीमध्ये पहिला महापौर होण्याचा मान हा महिलेला मिळाला आहे. या आरक्षण सोडतीमध्ये जालन्याचे महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे शहर महानगरपालिकेत आता महिला राज पहायला मिळणार असून पहिल्या महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहर महानगरपालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया 15 जानेवारी रोजी पार पडली. यामध्ये 65 नगरसेवक निवडून आले असून आता सर्वांचे लक्ष पहिला महापौर कोण होणार ? राजकीय तसेच सर्व सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदांची आरक्षण सोडत गुरुवारी मुंबई येथे मंत्रालयात काढण्यात आली. जालना महानगरपालिकेचा पहिला महापौर ठरवण्यासाठी येथील प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या स्वकीयांना निवडणुकीद्वारे निवडून आणलेले आहे. आता आरक्षण सोडतीमध्ये महापौर पद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झाले असल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपकडून चार अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या महिला नगरसेवकपदी निवडून आल्या आहेत. यात रिमा खरात, वंदना मगरे, श्रद्धा साळवे, रुपा कुरील यांचा समावेश आहे. यापैकी तीन महिला नगरसवेक या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या होत्या. त्यामुळे या तिघींपैकी कोणाची महापौर पदावर वर्णी लागते का? की मग दानवे गटाच्या रुपा कुरील या बाजी मारतात? हे लवकरच समजणार आहे. जालना शहर महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक असल्यामुळे भाजपाने पहिला महापौर आपलाच हवा, या दिशेने राजकीय डावपेच खेळले. पालिकेवर यापूर्वी कधीही भाजपची सत्ता आलेली नसल्यामुळे भाजपने जोरदार मोर्चेबांधणी करून पहिल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले. आता महापौरही भाजपचाच राहील, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, महापौर पदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपत प्रवेश केला. भाजपच्या यावेळच्या यशात गोरंट्याल यांचा मोठा वाटा आहे. शिवाय आरक्षण सोडतीत निघालेल्या महिला राखीव महापौर पदासाठी तीन महिला नगरसेवक त्यांच्याच गटातील आहे. त्यामुळे गोरंट्याल यांचे पारडे जड झाले आहे.

 – महापालिकेत गोरंट्याल यांचा वरचष्मा

महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, महानगरप्रमुख भास्कर दानवे यांच्या भूमिका महत्वाच्या होत्या. भास्कर दानवे, त्यांच्या पत्नी यांच्यासह कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी व मुलगा हे ही निवडून आले आहेत.

परंतु आरक्षण अनुसुचित जमाती महिलेसाठी राखीव झाल्याने गोरंट्याल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये आलेल्या चार महिला नगरसेवकांपैकी एकाची वर्णी लावण्याचा गोरंट्याल यांचा प्रयत्न असणार आहे. असे झाले तर नगरपालिकेप्रमाणेच महापालिकेतही कैलास गोरंट्याल यांचाच वरचष्मा राहणार आहे.

 – या आहेत महापौर पदासाठीच्या उमेदवार

जालना महानगरपालिका महापौर पदाचे आरक्षण सोडत अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे भाजपकडे असलेल्या चार महिला उमेदवारांची नावे सध्या चर्चेत असून यामध्ये रिमा खरात, वंदना मगरे, श्रद्धा साळवे या तीन महिला नगरसेवक कैलास गोरंट्याल यांच्या गटातील तर रूपा संजय कुरील या दानवे गटाच्या नगरसेवक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »