लासूर स्टेशन : नवरात्रोत्सवात दांडिया खेळत असतांना हृदयविकाराच्या धक्क्याने 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन येथील स्वामी समर्थ केंद्रात घडली. (३५ वर्ष), रा. पाडळसा, ता. गंगापूर, हल्ली मुक्काम बस स्टैंड परिसर, लासूर स्टेशन असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

लासूर स्टेशन येथील स्वामी समर्थ केंद्रात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. आरापूर येथील धनंजय ऑटो कंपनीत काम करणाऱ्या नंदिनी पवार ह्या शुक्रवारी रात्री गरबा, दांडिया खेळत असतांना त्यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या. यावेळी त्यांच्यासोबत दांडिया खेळणाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी लासूर स्टेशन येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी लासूर स्टेशन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शनिवार, 27 सप्टेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर मुळ गावी पाडळसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे.