धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथील 15 महिला व दोन पुरुष भाविक शुक्रवार, 18 जुलैला पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, स्नानासाठी चंद्रभागा नदीत गेलेल्या दोन महिलांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमरास घडली.

विठुरायाच्या दर्शनासाठी वारीत लवकर नंबर लागावा म्हणून शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास चंद्रभागा नदीत स्नानासाठी या महिला उतरल्या होत्या. संगीता संजय सपकाळ ( 40 ), सुनिता माधव सपकाळ ( 41 ) असे मृत्यू झालेल्या महिलांचे नाव आहे. संगीता सपकाळ या पाण्यात वाहून जात असताना सुनीता सपकाळ यांनी त्यांना वाचविण्यासाठी अंगावरचा फडका फेकला. दरम्यान, त्याही पाण्यात वाहून गेल्या. दरम्यान, सकाळी आठ वाजता संगिता सपकाळ यांचे तर दुपारी 1 वाजता सुनीता सपकाळ यांच्या मृतदेहांचा शोध लागला. दरम्यान, पंढरपूर येथे जाऊनही विठुरायाचे दर्शन घेण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली. दरम्यान, त्यांच्या मृत्यूची वार्ता धावडा गावात कळल्यानंतर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली