सावकारी अत्याचाराच्या विरोधात हायकोर्टात जाणार : आ. गायकवाड ; बुलढाणा, मोताळा तालुक्यातील प्रकार : कर्जदार महिलेच्या मुलीला परराज्यात विकले!

बुलढाणा : कर्ज वसूलीसाठी घरात घुसलेल्या सावकार सुनील बुरडने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी सुनील बुरडला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जामीना विरोधात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांनी हायकोर्टात जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

बुलढाणा : कर्ज वसूलीसाठी घरात घुसलेल्या सावकार सुनील बुरडने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याला पोक्सो कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी सुनील बुरडला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून जामीना विरोधात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांनी हायकोर्टात जाणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

या कुकर्मी सावकाराने कर्जदार महिलेच्या मुलीला विकत घेवून पैसे वसूल केल्याची धक्कादायक घटनाही यादरम्यान उघडकीस आली. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या बोरखेड, तारापूर, तरोडा येथील आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत, सावकार सुनील बुरड याच्या काळ्या करतुदीचा आ. गायकवाड यांनी पर्दाफाश केला. बुलढाणा येथील मातोश्री कार्यालयात पीडित शेतकऱ्यांसह आ. गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी माहिती दिली. सावकार सुनील बुरड याच्या विरोधात बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली होती. बुरडने बोरखेडमध्ये गैरव्यवहारातून शेती घेतलेली आहे. या व्यवहारांना सावकारकीची काळी किनार असून हा काही दिवसांपूर्वी बोरखेडमध्ये पोहोचला होता. ज्याच्याशी व्यवहार आहे, त्याच्या घरी कुणी नसल्याने घरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग त्याने केला. याप्रकरणी न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला असून आता आ. संजय गायकवाड यांनी या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. 

पोलिसांनी सावकाराची बाजू घेतली : गायकवाड

अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी पोलिसांनी सावकाराची बाजू घेतल्याचा आरोप आ. संजय गायकवाड यांनी केला. पीडित मुलीसह बुरडच्या सावकारी जाचाला वैतागलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार असल्याचे आ. गायकवाड यांनी सांगितले.  

बुरडच्या विरोधात अनेक प्रकरणे 

सुनीला बुरड हा अनाधिकृत सावकार असून, त्याच्या विरोधात उपनिबंधक कार्यालयात अनेक प्रकरण दाखल आहेत. शेतकऱ्यांना कर्ज द्यायचे व चक्री व्याजाने त्यांच्याकडून कितीतरी पट जास्त वसूल करावे, असा त्याचा धंदा सुरू आहे.  इतकेच नाही तर थकीत कर्जदाराच्या मुलीला विकत घेतले व तिचा विवाह राजस्थान येथे लावून दिल्याची माहिती पीडितांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »