मृत्युपत्र बनावट, खात्यातील पैसे काढले; मंगरूळपीर पोलिसांत तक्रार

मंगरूळपीर : तालुक्यातील जनुना येथील रहिवासी महिला अंजू रोशन भगत हिच्या पतीचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून तिच्या खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंजू भगत यांनी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

तक्रारीनुसार, कारंजा येथील सेटीन क्रेडिट केअर लिमिटेड (हरियाणा) या संस्थेच्या अमरावती विभागामार्फत अंजू रोशन भगत यांना ४५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. सदर रक्कम मंगरूळपीर येथील पोस्ट ऑफिसमधील त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली होती.

मात्र, योगेश सिद्धार्थ खडसे (रा. अमरावती) व आकाश भगवान कोवे (रा. शिवरा, जि. यवतमाळ) या दोघांनी महिलेचे पती रोशन भगत यांचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र तयार करून कंपनीच्या शाखेतून सदर रक्कम काढून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या खोट्या मृत्युपत्रात रोशन भगत यांचा मृत्यू  ९ मार्च २०२४ रोजी झाल्याचे दाखविण्यात आले असून, १८ मार्च २०२४ रोजी मृत्यू नोंद झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, रोशन भगत हे प्रत्यक्षात हयात असून त्याबाबतचे अधिकृत हयातीचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. याच खात्यात शासनाच्या ‘लाडकी बहीण’ योजनेची रक्कम देखील जमा होत होती, ती रक्कमही संशयितांनी काढून घेतल्याचा आरोप अंजू भगत यांनी केला आहे. या प्रकरणी २ जानेवारी  रोजी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, आर्थिक फसवणूक व बनावट दस्तऐवजांच्या आधारे रक्कम काढल्याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »