महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून नववर्षाचे स्वागत

वाशिम : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संकल्प मल्टिपर्पज फाऊंडेशन व सहयोग फाऊंडेशनच्या पुढाकारातून सामाजिक भावना जोपासत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील विविध महापुरुषांचे पुतळे व तैलचित्रे स्वच्छ करून, हारार्पण व अभिवादन करत नववर्षाचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन संकल्प मल्टिपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशील भिमजियाणी व सहयोग फाऊंडेशनच्या अध्यक्ष संगीता वसंत इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. येथे शिवरायांच्या पुतळा व परिसर स्वच्छ करण्यात आला व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर टिळक बागेतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराणा प्रतापसिंह, वस्ताद लहुजी साळवे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वातंत्र्यवीर तुकाराम रावजी परळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, ध्रुव महाराज, कर्मयोगी संत गाडगेबाबा, नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच टिळक चौक येथील लोकमान्य टिळक स्मारक आदी ठिकाणचे पुतळे व तैलचित्रे स्वच्छ करण्यात आली.  उपक्रमाचा समारोप महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांचे स्वच्छता व हारार्पण करून करण्यात आला. 

सलग सातव्या वर्षी पुतळा स्वच्छतेचा उपक्रम

हा उपक्रम यंदा सलग सातव्या वर्षी राबविण्यात आला. प्रत्येक ठिकाणी प्रथम परिसराची झाडू–खराट्याने स्वच्छता करून पुतळे पाण्याने धुतले गेले व नंतर पूजन करून महापुरुषांचा जयजयकार करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू धोंगडे, सोनाली गर्जे, वनमाला ढगे, छाया पवार, अजय ठाकूर, अतिष कश्यप, अ‍ॅड. सुरेश टेकाळे, वृषाली टेकाळे, स्नेहल घारड, नगरसेवक गजानन लांडगे, बाळू मुरकुटे, जयश्री सारडा, आशिष इंगोले, बंटी वाघमारे, योगेश लोनसुने, उमेश मोहळे, प्रवीण इंगोले, प्रशांत इंगोले, सचिन पेंढारकर, गणेश मोहळे, रेखा रावले, कपील सारडा, पवन विभुते, विष्णू इंगळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »