वाशिम नगरपरिषद : प्रभाग 1 आणि 2 मध्ये भाजपचे उमेदवार विजयी

वाशिम : वाशिम नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या मतमोजणीअंती विविध प्रभागांतील सदस्यपदाचे निकाल जाहीर होत असून, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रभाग 1 आणि 2 मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाग क्रमांक १ मधून अनिल ताजने हे भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, त्यांच्यासोबत  अरुणा वाटाणे यांनीही भाजपकडून विजय मिळवला आहे.

प्रभाग क्रमांक २ मधून माजी आमदार लखन मलिक यांचे सुपुत्र नितेश मलिक हे भाजपचे उमेदवार विजयी ठरले आहेत. तसेच कासाबाई लोणसूने यांनीही भाजपकडून वाशिम नगरपरिषद सदस्यपदाची निवडणूक जिंकली आहे.

विजयी उमेदवारांचे समर्थकांनी फटाके फोडून व घोषणा देत जल्लोष केला. दरम्यान, अंतिम आकडेवारी व उर्वरित निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »