Vijaya Rahatkar : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा छत्रपती संभाजीनगरच्या कन्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत.
छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा छत्रपती संभाजीनगरच्या कन्या विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्या या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत. या नियुक्तीमुळे त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळणार आहे.
विजया रहाटकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून प्रभावी कामगिरी केली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमा, प्रज्ज्वला, सुहिता अशा उपक्रमांच्या माध्यमातून महिलांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात आल्या होत्या. त्यांच्या या अनुभवामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नेमले आहे.
राष्ट्रीय महिला आयोग हे संवैधानिक संस्था असून, महिलांच्या हक्कांसाठी काम करणारी एक प्रभावी संस्था आहे. त्याचे प्रमुख कार्य महिलांच्या समस्या सोडविणे, महिला सक्षमीकरणासाठी उपाययो सुचविणे, तसेच महिलांविषयक धोरणांसाठी व राज्य सरकारांना मार्गदर्शन करणे आदी आहे. रहाटकर यांनी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे महापौर ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा अशी नेत्रदीपक मजल मारल्याच्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून येत आहेत.