पारध : खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या जखमा ताज्या असतानाच रब्बी हंगामातील भरलेल्या पिकांना अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पारध : खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीच्या जखमा ताज्या असतानाच रब्बी हंगामातील भरलेल्या पिकांना अवकाळी पावसाने तडाखा दिला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भोकरदन तालुक्यातील पारध येथे बुधवार, २ एप्रिल रोजी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह झाला. यामुळे रब्बी हंगामातील गहू, मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा जोरदार पाऊस यामुळे रब्बी हंगामातील हाती आलेले पीक वाया गेले आहे. सोंगणीवर आलेले मका, गव्हाचे पीक आडवे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. वादळी वाऱ्यामुळे फुल शेती, पानतांडे यांना मोठ्या फटका बसला. पानतांडे, केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे.
मी माझ्या शेतात २० गुंठ्यांत पानतांडे लावलेले आहे. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे, वाऱ्यामुळे माझ्या पानतांडे, केळी, पपई, नागवेली पानाचे मोठे नुकसान झाले. या २० गुंठ्याच्या पान तांड्यामधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायला लागतो. एक एकर मक्का लावली होती. ती सुद्धा अवकाळी पावसामुळे जमीन दोस्त झाली. जनावरांना चारा सुद्धा उरला नाही. त्यामुळे यावर्षी चाऱ्याची सुद्धा अडचण निर्माण होणार आहे.
– कैलास तेलंग्रे, शेतकरी