अवैध शस्त्रासह दोन संशयितांना अटक; जाफ्राबाद पोलिसांची  कारवाई 

माहोरा : जाफ्राबाद पोलिसांनी   अवैध शस्त्रासह दोन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत  पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार ( एम एच – 4 एफआर 4185 ), एक धारदार चाकू जप्त केला आहे. भोकरदन – जाफराबाद रस्त्यावर सोमवार, 7 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. 

  जाफ्राबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस. जाधव यांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला निर्देश दिले.  पोलिसांनी आबेद हबीब मूलतानी, शाहीद कदीर मूलतानी ( दोघेही रा. गारखेडा, ता. जाफराबाद ) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »