Two killed in a car accident: कारची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

Two killed in a car collision

Two killed in a car accident: राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील धानोरा विटाली उड्डाणपुलाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार ३ एप्रिल रोजी घडली.

Two killed in a car collision
Two killed in a car collision

मलकापुर (जि.बुलढाणा) : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील धानोरा विटाली उड्डाणपुलाजवळ एका भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार ३ एप्रिल रोजी घडली. दोन्ही मृतक हे मजुर असल्याची माहिती आहे.

मलकापूर तालुक्यातील ग्राम वडोदा येथे बांधकामासाठी नांदुरा तालुक्यातील गोसिंग येथील संजय दुर्योधन हाडे (35), मंगेश शांताराम सुरळकर (28) हे दोघे मोटर सायकल क्रमांक एम एच 28 एएफ 2495 ने आले होते सायंकाळी बांधकाम आटोपून त्यांच्या दुचाकीने गुसिंग येथे जात असताना त्यांच्या दुचाकीस जि जे 15 सी जे 6672 या कार ने जोरदार धडक दिली या धडकेत संजय दुर्योधन हाडे (35) याचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला तर मंगेश शांताराम सुरडकर हा गंभीर रित्या जखमी झाला. गंभीर जखमीला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान नेत असताना वाटेतच त्यांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत राठोड करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »