चिखली : कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन अल्पयीन मुलींचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार, 18 जून रोजी दुपारी नायगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण चिखली तालुका हादरला असून हळहळ व्यक्त होत आहे.

वैष्णवी महादेव खंडारे (17 वर्ष) रा. कव्हळा, राजनंदिनी निंबाजी नाटेकर (10वर्ष) रा. नायगाव, असे मृतक मुलींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, चिखली तालुक्यातील नायगाव येथे नाटेकर कुटुंबीयांच्या घरी १६ जूनला लग्न होते. त्यासाठी कव्हळा येथील खंडारे कुटुंबीय नायगाव खु. येथे आले होते. लगीन घरच्या काही मुली बुधवारी दुपारी गावातील धरणात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी काही अंघोळीसाठी पाण्यात उतरल्या. पाण्याचा अंदाज न आल्याने वैष्णवी खंडारे व राजनंदिनी नाटेकर या दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोघींचे मृतदेह उत्तर तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
नायगावात शोककळा
बुधवारी दुपारी घटनेची माहिती होताच संपूर्ण नायगाव हादरले. या घटनेच्या सर्व ग्रामस्थांच्या हृदयावर तीव्र वेदना झाली असून, खंडारे व नाटेकर परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण नायगावात शोककळा पसरली आहे.