dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विशाल आर्वीकर हत्या प्रकरणी दोघेजण ताब्यात; नानलपेठ पोलिसांत गुन्हा दाखल

परभणी :  शहरातील जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर या तरुणाचा भर रस्त्यात चौघांनी धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना ९ मे रोजी रात्री घडली. या हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

परभणी :  शहरातील जिंतूर रस्त्यावरील ठाकरे कमान परिसरात विशाल आर्वीकर या तरुणाचा भर रस्त्यात चौघांनी धारदार शस्त्रांनी हत्या केल्याची घटना ९ मे रोजी रात्री घडली. या हत्या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना नानलपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आर्वीकर हा तरुण शुक्रवारी रात्री नऊ – साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील जिंतूर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे कमान परिसरात परिचितांना बोलत थांबला होता. यावेळी तोंडाला बांधलेले चौघेजण मोटरसायकलवर धारदार शस्त्र घेऊन विशाल थांबलेल्या ठिकाणी आले. त्यांनी विशालवर धारदार शस्त्र आणि हातोड्याने सपासप करत त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतर चारही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी गंभीर जखमी होवून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशाल आर्वीकर यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

या प्रकरणी वर्षा गिराम यांच्या फिर्यादीवरून नानालपेठ पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी पसार झालेल्या चार आरोपींपैकी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस अधिक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी दिनकर डंबाळे, पोलिस निरिक्षक कामठेवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक खज्जे हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top