बुलढाणा : खून आणि आत्महत्या अशा वेगवेगळ्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने विशेष शोध मोहिमे अंतर्गत दोन दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, खून प्रकरणातील आरोपी हा दहा वर्षांपासून फरार होता.

बुलढाणा : खून आणि आत्महत्या अशा वेगवेगळ्या प्रकरणातील दोन फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने विशेष शोध मोहिमे अंतर्गत दोन दिवसांत बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, खून प्रकरणातील आरोपी हा दहा वर्षांपासून फरार होता.
बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारे, रायपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणातील फरार आरोपी बुलढाणा शहरात येत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा रचून शेख इरफान उर्फ काल्या शेख अश्पाक (३३, रा. मिलींदनगर, बुलढाणा) यास अटक करण्यात आली. हा आरोपी २०१६ पासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असून, त्याचा शोध पोलिसांना अनेक वर्षे लागत नव्हता. त्यास अटक करत रायपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील कारवाई रायपूर पोलीस करीत आहेत. तत्पूर्वी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न तथा दुसऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणे असा स्वरुपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध मंगळवार, 18 नोव्हेंबरला लागला. जालना जिल्ह्यातील कन्हैयानगर येथून त्यास अटक करण्यात आली. अभय दिलीप डोंगर असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात आहे.
कारवाई पथक..
पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शाखाली पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पीएसआय अविनाश जायभाये, पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, दिंगबर कपाटे, पोलिस नायक अनंता फरतळे, सुनील मिसाळ, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश वाघ, मनोज खरडे, महिलापोलिस कर्मचारी आशा मोरे यांनी सहभाग घेतला होता.
