वेरूळ घाटात ट्रक – आयशरची धडक ; टँकखाली दबून दोघांचा जागीच मृत्यू !  

वेरूळ :  जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या घाटात औद्योगिक टँक घेऊन जाणारा आयशर व 16 टायर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर ट्रकवरील टँकचा बेल्ट तुटून तो रस्त्यात कोसळला त्याखाली दबून दोन निष्पक जीवाचा करून अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेनंतर वेरूळे घाटातील वाहतूक दुपारनंतर बंद होती. 

वेरूळ :  जगप्रसिद्ध वेरूळ लेणीच्या घाटात औद्योगिक टँक घेऊन जाणारा आयशर व 16 टायर ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर ट्रकवरील टँकचा बेल्ट तुटून तो रस्त्यात कोसळला त्याखाली दबून दोन निष्पक जीवाचा करून अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेनंतर वेरूळे घाटातील वाहतूक दुपारनंतर बंद होती. 

याबाबत अधिक माहिती अशी की वेरूळ येथील रहिवासी कचरू सांडू त्रिभुवन (वय 42) हे गाडी क्र. ( एम.एच. 20,1404) वर त्यांची सासू चंद्रभागाबाई आसाराम भालेराव ( वय 65) रा. राजीव गांधीनगर खुलताबाद यांना घेऊन खुलताबादकडे जात होते. तेवढ्यात कन्नड कडून संभाजीनगरकडे जाणारा आयशर ट्रक ( एम.एच.42, 9646) व खुलताबादहून कन्नडकडे जाणारा 16 टायर ट्रक क्र.( एम.एच.40, 7355) यात समोरासमोर धडक झाल्याने आयशर ट्रक मध्ये असलेल्या औद्योगिक टँकरचा बेल्ट तुटून टँकर हा रस्त्यावर आडवा पडला. या घटनेमध्ये कचरू सांडू त्रिभुवन व त्यांच्या सासुबाई चंद्रभागाबाई भालेराव  दबल्या या घटनेमध्ये जावई आणि सासूचा जागीच  करून अंत झाल्याची घटना घडली. यात सामाजिक कार्यकर्ते शेख मस्सीउद्दीन यांनी कचरू त्रिभुवन व त्यांच्या सासू चंद्रभागाबाई भालेराव यांना घेऊन खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

टँकखाली दबली कार 

याच अपघातावेळी संदीप घुगे हे त्यांच्या परिवारासह स्विफ्ट डिझायर कारने मेहेगाव ता. कन्नड येथून खुलताबादकडे जात होते. त्यांच्या स्विफ्ट कारला सदरील टँकर हा धडकल्याने त्यांच्या कारचा समोरील भाग हा टँकर खाली दबला. सदरील टँकर जागेवर थांबल्याने पुढून येणाऱ्या अनेक मोटर सायकल व कार मधील मोठा अपघात टळला. 

ट्रक चालकांकडून नियमांचे उलंघन  

वेरूळ येथील भोसले चौक ते दौलताबाद टी पॉइंट पर्यंत रस्ता मागील काही दिवसापासून जड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यात खुलताबाद येथे उरूस सुरू असून अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मात्र असे असून देखील सदरील औद्योगिक वापरासाठीची जड वाहतूक सुरू आहे. त्यांच्याकडून नियमांचे उलंघटन होत अससल्याने समान्यांना अपघाताचा सामना करावा लागत असल्याच्ाी प्रतिक्रिया वेरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »