छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणास आणि मानवी जीवितास हानिकारक असलेल्या नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्या तीन जणांवर गुन्हेशाखा पोलिसांनी शुक्रवार, 19 डिसेंबर रोजी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या ताब्यातून 2 लाख 16 हजार 750 रुपये किंमतीचे 289 गट्टू जप्त केले असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी शनिवार, 20 डिसेंबर रोजी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत दिपक कानडे (26 वर्ष), रा. पुंडलिकनगर याच्या ताब्यातून 1 लाख 8 हजार रुपये किंमतीचे 144 नायलॉन मांजाचे गट्टू, गोविंद कृष्णा साळूंके (19 वर्ष), रा.हनुमान नगर, गारखेडा परिसर यांच्या ताब्यातून नायलॉन माजाचे 97 गट्टू, तुषार रविंद्र काथार (22 वर्ष), रा. आविष्कार कॉलनी, सिडको याच्या ताब्यातून नायलॉन मांजाचे 48 गट्टू असा एकूण 2 लाख 16 हजार 750 रुपये किंमतीचे 289 नायलॉन मांजाचे गट्टू गुन्हेशाखा पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई गुन्हेशाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक थोरात, गुन्हेशाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम, पोलिस अंमलदार राजेंद्र सोळुंके, श्रीकांत काळे, मनोहर गीते, जालिंदर गोरे, अभिषेक बाठे, प्रतिक साबळे, रोहित जाधव, दिनकर आवारे, अभिषेक राऊत, अक्षय नाटकर, सागर साळवे, सागर शेंडे, तुषार सपकाळ, निहाल सोनटक्के, महिला पोलिस अंमलदार पुजा भोसले, वनिता तुपे आदींच्या पथकाने केली. नायलॉन मांजाचा साठा करुन विक्री करणाऱ्याविरुध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.