सिंदखेड राजा : वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ जून रोजी रंगेहात पकडले.

सिंदखेड राजा : वर्ग दोनची जमीन वर्ग एक करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून 7 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी व महसूल सहाय्यकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २४ जून रोजी रंगेहात पकडले.
तहसील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. तलाठी रावसाहेब काकडे व महसूल सहाय्यक मनोज झिने अशी लाच स्वीकारणाऱ्यांची नावे आहे. यातील तलाठी रावसाहेब काकडे याची सेवानिवृत्ती अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, पोलिसांनी रंगेहात धाड टाकत त्याला ताब्यात घेतले असून लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, शासकीय सेवेतील इतर भत्ते आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यापासून ते वंचित राहू शकतात. सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधिक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक भागोजी चोरमले, पोलीस निरीक्षक रमेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम भांगे, पोहेकॉ. प्रविण वैरागी, राजेंद्र क्षिरसागर, पोलीस नायक जगदिश पवार, विनोद लोखंडे, पोकॉ. शैलेश सोनवणे, रंजीत व्यवहारे, चापोना नितीन शेटे, चापोकॉ शेख अरशद यांनी पार पाडली.