dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

घरकुल, गायगोठा, सिंचन विहीरींचे अनुदान रखडले: किडनी घ्या पण कर्जातून मुक्त करा ; शेतकऱ्यांचे आंदोलन

भोकरदन : तालुक्यातील लाभार्थ्यांचे घरकुल, गायगोठा, सिंचन विहिरींचे अनुदान मागील कित्येक दिवसांपासून मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी भोकरदन तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आमची किडनी विकत घ्या, पण कर्जातून मुक्त करा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी बी,सरवनन व तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यासह राज्यामध्ये रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी गायगोठा, क्षलागवड सिंचन विहिर, घरकुलाचे कामे पूर्ण केले आहे. मात्र प्रशासकडून अद्यापही कुशल निधी वितरीत केला जात नाही. गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे घरकुलाचे मस्टर झिरो करण्याचे प्रकार सुरु आहेत. शेकडो मस्टर झिरो केल्यामुळं लाभार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून कामे पूर्ण केली आहे. परंतु लाभार्थ्यांना निधी मिळत नसल्याने आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच राज्यातील सर्व बिडिओ बेकायदेशीपणे संपावर गेलेले आहे. चार दिवसापासून संप करणाऱ्या सर्व बिडीओंचे वेतन कपात करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही आंदोलकांनी यावेळी केली. मस्टर सुरू करा, अन्यथा 12 डिसेंबरला नागपुरात उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top