Stone pelting at Dhad : तालुक्यातील धाड येथे दोन गटात वाद झाल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा घडली. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने धाड येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
बुलढाणा : तालुक्यातील धाड येथे दोन गटात वाद झाल्याची घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा घडली. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने धाड येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू होती. धाड गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.
तणावाची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.