dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

चोरी गेलेले एक्सप्लोसिव्ह डेटोनेटर हस्तगत ; १.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार आरोपी अटक

वाशिम :  ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेले ४,०७६ एक्सप्लोसिव्ह डेटोनेटर स्थानिक गुन्हे शाखा, वाशिमने हस्तगत केले असून, या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. जप्त मुद्देमालाची किंमत १,६९,४८८ रुपये आहे.

१९ सप्टेंबर २०२५ रोजी सावरगाव बर्डे येथील परवानाधारक मॅगझीनमधून डेटोनेटर चोरीस गेल्याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डेटोनेटरचा गैरवापर होऊ शकत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.

खात्रीशीर माहितीच्या आधारे सावरगाव बर्डे शिवारात छापा टाकून सोयाबीन कुटाराच्या गंजीत लपवून ठेवलेले ७ नायलॉन कट्ट्यांतील डेटोनेटर पंचासमक्ष जप्त करण्यात आले.

याप्रकरणी सुनील सुरेश कंकाळ, अमोल पांडुरंग बर्डे, दशरथ पांडुरंग बर्डे व गोविंदा उर्फ राजेश सोपान कड (सर्व रा. सावरगाव) यांना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास वाशिम ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top