Deputy Chief Minister Fadnavis in Khamgaon :  लाडक्या बहिणींच्या अर्थिक बळकटीकरणामुळे सावत्र भावांना पोटदुखी : उपमुख्यमंत्री फडणवीस

Deputy Chief Minister Fadnavis in Khamgaon

Deputy Chief Minister Fadnavis in Khamgaon : महायुती सरकारने बहिणींच्या आर्थिकबळकटीकरण आणि आर्थिक सक्षमतेसाठी ही योजना आणली आहे. परंतु विरोधक लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, लेक लाडकी योजनाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशाला अपव्यय संबोधून योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा पोटदुखी उठलेल्या सावत्र भावांना लाडक्या बहिणी त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Deputy Chief Minister Fadnavis in Khamgaon

अनुप गवळी / खामगाव : महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधात महाविकास आघडीतील काँग्रेसचे नेते लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना बंद करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. महायुती सरकारने बहिणींच्या आर्थिकबळकटीकरण आणि आर्थिक सक्षमतेसाठी ही योजना आणली आहे. परंतु विरोधक लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासात 50 टक्के सवलत, लेक लाडकी योजनाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशाला अपव्यय संबोधून योजना बंद करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा पोटदुखी उठलेल्या सावत्र भावांना लाडक्या बहिणी त्यांची जागा दाखवतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
खामगाव विधानसभा मतदार संघातील 2365 कोटी रूपयांच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त 6 आक्टोबर रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय आयुष व कुटूंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, आ. ॲड. आकाश फुंडकर, आ. डॉ. संजय कुटे, माजी आ. चैनसुख संचेती, माजी आ. विजयराज शिंदे आदिंची उपस्थिती होती. पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या जिगाव प्रकाल्पाला 7 हजार कोटी रूपये दिले असून त्याठिकाणी प्रकल्पाचे काम युध्दपातळी पुढे जात आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनव्दारे पाणी पोहचणार असून कोरड वाहूचा शिक्का पुसला जाणार असल्याचे देवेंद्र फडणवीस याचे म्हणाले.

दुष्काळी भागात पाणी पोहोचविणार

नळगंगा – वैनगंगा – पैनगंगा 550 किलो मिटरची नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून 90 हजार कोटींचा खर्च करून 10 लाख हेक्टर जमीन ओलीताखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम ते बुलढाणा पर्यंत असलेल्या दुष्काळी भागात पाणी पोहोचविल्या जाणार आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »