Soldier from Buldhana district dies: कर्तव्यावर असताना हृदयविकारच्या तीव्र धक्क्याने दुसरबीड येथील प्रदीप पंढरीनाथ घुगे या सैनिकाचे दुर्दैवी निधन झाले. ही धक्कादायक घटना त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथे बांग्लादेश सीमेवर 25 नोव्हेंबर रोजी घडली.
सिंदखेडराजा : कर्तव्यावर असताना हृदयविकारच्या तीव्र धक्क्याने दुसरबीड येथील प्रदीप पंढरीनाथ घुगे या सैनिकाचे दुर्दैवी निधन झाले. ही धक्कादायक घटना त्रिपुरा राज्यातील आगरताळा येथे बांग्लादेश सीमेवर 25 नोव्हेंबर रोजी घडली.
४५ दिवसांची सुट्टी घेतल्यानंतर १९ सप्टेंबर रोजी आगरताळा येथे आपल्या कर्तव्यावर प्रदीप घुगे हजर झाले होते. बांगलादेश सीमेवर सोमवारी कर्तव्य बजावत असतानाच रात्री १२ वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. यामध्ये त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, आईवडील, दोन भाऊ, एक बहिण असा आप्त परिवार आहे. प्रदीप घुगे हे सन २००६ मध्ये बुलढाणा येथील बीएसएफ १२२ बटालियनच्या भरतीत शिपाई पदावर भरती झाले होते. आतापर्यंत १८ वर्ष सेवा त्यांनी पूर्ण केली होती. दोन वर्षांनंतर ते सेवानिवृत्त होणार होते. त्यांचा मृतदेह आगरताळा येथून कोलकाता, इंदौर मार्गे २८ नोव्हेंबर रोजी दुसरबीड येथे दाखल होणार आहे. घुगे यांच्या निधनाची वार्ता मिळताच जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे.