Sillod News :  बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार विरोधात सिल्लोडमध्ये निघाला भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा

Sillod News

Sillod News : बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार त्वरीत थांबवा यासह इतर मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवार १४ ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे भव्य हिंदु जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

Sillod News
बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार विरोधात सिल्लोडमध्ये निघाला भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा

सिल्लोड : बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार त्वरीत थांबवा यासह इतर मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवार १४ ऑगस्ट रोजी सिल्लोड येथे भव्य हिंदु जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यासाठी सिल्लोड तालुका बंदची हाक देण्यात आली होती. तालुक्यात व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठिने बंद ठेवून निषेध नोंदवला.
सिल्लोड शहरात व्यापाऱ्यांनी व्यावसायिक प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून हिंदु जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. हिंदु धर्मातील संत- महंत यांच्यासह सकल हिंदु समाज बांधव आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदू बांधवांनी निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील भगवान महावीर चौक येथे प्रमुख मार्गदर्शन प्रखर राष्ट्रभक्त सुरेश चव्हाणके, संत महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

Sillod News
बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार विरोधात सिल्लोडमध्ये निघाला भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा

बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराचा कडकडून निषेध करत हिंदूवर होत असलेले अत्याचार निंदनीय असून घुसखोरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावर वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सुरेश चव्हाणके यांनी सभेत बोलतांना केले. जिहाद विषयावर बोलताना आपण हिंदू आहोत आपण आपल्या कुटुंबात परिवारासाठी वेळ दिला पाहिजे. सध्या काय घडत आहे, राजकरणाचा विषय सोडून कुटुंबाला खरी गरज हिंदू जनजागृती करण्याची असल्याचे बोलतांना सांगितले. आम्ही दिल्लीपासून तर संपूर्ण राज्यात या संदर्भात विविध प्रकारच्या दहा मागण्यांची मागणी करत आहोत. त्यासाठी खऱ्या अर्थाने हिंदुंनी एकत्रित येत लढा देण्याची गरज आहे. आता ती वेळ आली आहे.

बांगलादेशातीला घटनेचा चव्हाणके यांनी कडकडून विरोध करत आपले विचार प्रगट केले. यावेळी सभास्थळी उपस्थित सकल हिंदू समाजाला चव्हाणके यांनी शपथ दिली. याप्रसंगी व्यासपीठावर संत महंत यांची उपस्थिती होती. यावेळी मागण्यांचे निवेदन प्रभारी तहसीलदार शेख हारुण यांना देण्यात आले. अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शेषराव उदार (सिल्लोडशहर) पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत (सिल्लोड ग्रामीण) यांच्या सह अजिंठा, सोयगाव, फर्दापूर, वडोद बाजार येथील पोलिसांचा बंदोबस्त होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »