Sillod Constituency : सिल्लोड-सोयगाव मतदार संघ 104 मधील वार्ड क्रमांक 3 मध्ये माजी नगरसेविका रुपाली मनोज मोरेल्लु यांना निवडणूक विभागाने मतदार पोलचीट पाठवले होते. सदर पोलचीटच्या मागे मतदान केंद्राच्या रकान्यात चक्क “पुरुष मुतारी” चे फोटो छापलेले असल्याचे त्यांना आढळले.
सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव मतदार संघ 104 मधील वार्ड क्रमांक 3 मध्ये माजी नगरसेविका रुपाली मनोज मोरेल्लु यांना निवडणूक विभागाने मतदार पोलचीट पाठवले होते. सदर पोलचीटच्या मागे मतदान केंद्राच्या रकान्यात चक्क “पुरुष मुतारी” चे फोटो छापलेले असल्याचे त्यांना आढळले. प्रकरणात त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य सह संबंधित सर्व अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे लेखी तक्रार दाखल करून आपला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
रुपाली मोरेल्लु यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर व विकृत स्वरूपाचे असल्याचे म्हटलें आहे. सदर प्रकारामुळे महिलांना शरमेने खाली मान घालायची वेळ आली आहे. सदर प्रकार एक जागरूक मतदार व माजी नगरसेविका म्हणून मी कदापी खपवून घेणार नाही असे आपल्या निवेदनात म्हटलें आहे. ज्या अधिकाऱ्यांनी सदर फोटो मतदार पोलचीट वर छापले आहे अशा सर्वांवर महिलांचा विनयभंग केला या कारणामुळे गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. सदर प्रकार संपूर्ण सिल्लोड शहरात चर्चेचा विषय झाला आहे.