जालना : खरिपाची पेरणी सुरू असून जालना जिल्ह्यात ऐन पेरणीच्या हंगामात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रामुख्याने युरियाचा जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान, याबाबत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शुक्रवार, 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक बोलावली आहे.

याबाबत खासदार डॉ. कल्याण काळे यांनी गुरुवार, 26 जून रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन जिल्ह्यातील खतांच्या टंचाईबाबत शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि अधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक नियोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, खतांचा पुरवठा करणाऱ्या संस्था, मार्केटिंग फेडरेशनचे प्रतिनिधी, नोडल अधिकारी, कृषि विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित राहणे अनिवार्य असल्याचे खासदार डॉ. काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याबाबत रात्री उशिरा डॉ. काळे यांनी माध्यमांना माहिती दिली.
3445 मॅट्रिक टन युरियाचा तुटवडा
जालना जिल्ह्यात जून महिन्यात 29 हजार 534 मॅट्रिक टन युरिया मंजूर असून यापैकी 22 हजार 418 मॅट्रिक टन युरिया प्राप्त झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी 3445 मॅट्रिक टन युरियाचा तुटवडा निर्माण झालेला असल्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.