शिवसेना उबाठाच्या भूमिकेकडे लक्ष: मुख्यमंत्री-राज ठाकरेंच्या भेटीने कार्यकर्त्यामध्ये संभ्रम

छत्रपती संभाजीनगर ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची चर्चा शिर्षस्थानी होती. दोन ठाकरे ंधूंच्या एकत्रिकरणामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. भाजपाचे खा. नारायण राणे यांना खुले आव्हान देणाऱ्या मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या भेटीला विरोधी पक्षनेते आंबादास दानवे गेले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकर यांच्या भेटीमुळे आता कार्यकत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

सतीश रेंगे / छत्रपती संभाजीनगर ः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याची चर्चा शिर्षस्थानी होती. दोन ठाकरे ंधूंच्या एकत्रिकरणामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. भाजपाचे खा. नारायण राणे यांना खुले आव्हान देणाऱ्या मनसे नेते प्रकाश महाजन यांच्या भेटीला विरोधी पक्षनेते आंबादास दानवे गेले मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकर यांच्या भेटीमुळे आता कार्यकत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना उबाठा की भाजपा, राज साहे नेमका काय निर्णय घेणार ? याकडे खास करून मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीच्या उमेदवारांना पाठींबा दिला. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात मनसेने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार खा.संदिपान भुमरे यांचा प्रचार केला. त्यानंतर मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत एकला चलोची भूमिका घेतली. काही महिन्यापूव दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीनंतर शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याच्या चर्चेला उधान आले. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर ही चर्चा शिर्षस्थानी असतांना अचानक गुरूवारी सकाळी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एका हॉटेल मध्ये बंद दाराआड एक तास चर्चा झाली. या चर्चेचा विस्तृत्त वृत्तांत समोर आला नसला तरी शिवसेना उबाठा पक्षाशी जवळीकता वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसैनिकांची मात्र गोची झाली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीदरम्यान याच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी जंगजंग पछाडले होते. 

प्रकाश महाजनांची गोची

भाजपा मंत्री नितेश राणे यांच्यावर टिका करतांना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खा. नारायण राणे यांनाही अंगावर घेतले. शहरातील क्रांती चौकात शक्तीप्रदर्शन करीत राणेंच्या विरोधात शड्डू ठोकला. मात्र आता पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच भापाचे सर्वेसर्वा असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने महाजन यांचीही गोची झाल्याचे पहायला मिळत आहे.  

दानवेंची सलगी निष्फळ

भाजपाचे खा. नारायण राणे यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मनसे नेते प्रकाश महाज यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली होती. दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान दानवेंनी ही सलगी दाखविली मात्र दुसऱ्याच दिवशी भाजपा – मनसे नेत्यांच्या भेटीमुळे ही सलगीही निष्फळ ठरली आहे. 

उबाठाच्या भूमिकेकडे लक्ष 

शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्यातील युतीची चर्चा सुरू असली तरी उबाठाकडून ठोस भूमिका न घेतल्याने ही चर्चा पुढे सरकू शकली नाही. दुसरीकडे मनसेकडूनही आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने उबाठाला कुठला प्रस्ताव पाठवला की नाही ? याची ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री – राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उबाठाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी उबाठा गोंधळलेला पक्ष असून तो सत्तेसाठी एमआयएम बरोबर सुध्दा युती करू शकतो अशी टिका केली आहे. 

पक्षादेश अंतीम

पक्षाध्यक्ष राज ठाकरे जो निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही आहोत. साहेबांनी वेळोवेळी योग्य निर्णय घेतले आहेत. लोकसभा असो की विधानसभा पक्षाने जाहीर केलेल्या भूमिकेबरोबर आम्ही राहिलो आहोत. त्यामुळे यावेळीळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जो आदेश देतील तो अंमलात आणण्याचे  काम आम्ही करू .

                          – सुमित खांबेकर, जिल्हाध्यक्ष, मनसे

आम्ही साहेबांबरोबर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीमुळे कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करणार आहोत. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जो निर्णय असेल त्याचे स्वागत करून आम्ही साहेबांबरोबर राहू.

                                 – बिपीन नाईक, महानगर अध्यक्ष, मनसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »