रिसोड : नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवार, १३ जानेवारी रोजी नगरपरिषद भवनात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश शेवदा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत शिंदेसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेवक विष्णू कदम यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

भाजप-शिंदेसेनेकडून उपाध्यक्षपदासाठी शिंदेसेनेचे विष्णू कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका सुरेखा दांदडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हात वर करून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या मतदानात विष्णू कदम यांना १५ तर सुरेखा दांदडे यांना ८ मते मिळाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सतीश शेवदा यांनी विष्णू कदम यांचा विजय अधिकृतरित्या जाहीर केला. या निवडणुकीवेळी भाजप व शिंदेसेनेचे सर्व नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी महाविकास आघाडी कडून बाळासाहेब देशमुख यांची, तर भाजपकडून भैया देशमुख यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड करण्यात आली. ही माहिती नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी सुनील मगर यांनी दिली.या निवडणुकीनंतर नगरपरिषदेतील सत्तासमीकरण अधिक बळकट झाल्याचे चित्र दिसून येत असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.