Sexual assault on a young woman: तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने छावणी पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने छावणी पोलीस स्टेशमध्ये दिली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी अंकीत संजय बावस्कर (28, रा.) याने 20 ऑक्टोबर 2022 ते 27 मार्च 2024 पर्यंत पडेगाव परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये वारंवार लैंगिक अत्याचार केले. यासाठी त्याने तिला लग्नाचे आमिष दिले होते. मात्र, शारिरीक संबंध ठेवल्यानंतर बावस्कर याने फिर्यादीला लग्नास नकार दिला. याप्रकरणी तरुणीने थेट छावणी पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन छापणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 417, 376 (2), (एन) 313 अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरळे हे करीत आहेत.
महिला, मुली छळवणुकीच्या तक्रारी वाढल्या
मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिसरात महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. याला प्रतिबंध घाण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज असल्याचे सुज्ञ छत्रपती संभाजीनगरकरांकडून मागणी होत आहे.