Sexual abuse of young women: लग्नाचे आमिष दाखवून तरुणांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा दोन घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील बेगपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. यातील एका घटनेत मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीविरूद्ध कारवाई करण्याची मागणी मुलीच्या आईने तक्रारीत केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील विविध भागात लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याच्या तक्रारी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. दाखल तक्रारीवरुन पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
पहिल्या घटनेत बेगमपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महिलेने तक्रार दाखल केली की, आरोपी अमन शेख यांने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारिरीक संबंध ठेऊन लैंगिक अत्याचार केला. तर आरोपी अमन शेख याच्यासोबत आणखी तीन महिला आरोपींनी अमन शेख यास फिर्यादी महिलेस शिवीगाळसह मारहाण करण्यास प्रोत्साहन दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडित महिलेने याप्रकरणाची तक्रार मुंबईतील पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली. दरम्यान अत्याचाराचे घटनास्थळ बेगमपुरा पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने संबंधित गुन्हा बेगमपुरा पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाणे हे करीत आहेत.
‘मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करा’
दुसरी घटना याच बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून, यामध्ये मृतक तरुणीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पंकज गणेश रावळकर याने फिर्यादी महिलेच्या मुलीसोबत ओळख करुन तिच्यासोबत वारंवार लैंगिक संबंध ठेवून लग्नास नकार दिला. आरोपीने फिर्यादी महिलेच्या मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्याने त्या मुलीने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तरुणीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेला आरोपी पंकज गणेश रावळकर आणि त्याचा भाऊ आशिष रावळकर या दोघांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची तक्रार बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे.