बुलढाणा : “जे आपण आपले मानतो ते सोडुन जावे लागणार आहे, आपण काहीही घेवून आलो नाही व काहीही सोबत जाणार नाही. इतरांचे दोष पाहण्यापेक्षा स्वतःचे दोष पहा शांती लाभेल, शरीर स्वस्थ राहण्यासाठी जसे भोजन आवश्यक आहे, तसे मन स्वस्थ राहण्यासाठी सत्संगाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवमहापूरण कथेचे दुसरे पुष्प गुंफतांना बाल संत दिपशरण महाराज यांनी केले.

सद्भावना सेवा समितीद्वारा ४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत जगदगुरु संत तुकाराम महाराज वारकरी भवन येथे दुपारी २ ते ६ या वेळेत शिवमहापूरण कथा पार पडत आहे. या दिवसाची संपुर्ण व्यवस्था जांगीड समाज महिला मंडळाने केली व प्रसाद वितरण अग्रवाल समाज महिला मंडळाकडून करण्यात आले होते. भस्मासुराची कथा, मिराचा दृष्टांत श्रोत्यांसमोर ठेवण्यात आला. ज्ञान व धन वितरीत केले तर वाढते, आणि भक्ती व प्रेम गुप्त ठेवल्याने वाढते. रावण ज्ञानी होता पण शबरी प्रेमी होती या भक्तांमध्ये प्रेम महत्वाचे आहे, असे मत बालसंत दिपशरण महाराज यांनी स्पष्ट केले. कथेचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाशचंद्र पाठक यांनी केले. तर स्टेजवर रविंद्र लध्दड, सुधाकर मानवतकर यांनी आरती केली.
ज्योतीर्लिंगाचे पुजन व रुद्राभिषेक
कथेला शिवभक्तांची प्रचंड गर्दी लक्षात घेता बुधवारपासून वारकरी भवनच्या वरच्या मजल्यावर हॉलमध्ये एल.ई.डी. स्क्रीन व आसनव्यवस्था करण्यात आली. कथा प्रारंभ होण्यापुर्वी अनुसया सुधाकर मानवतकर, बालीदेवी डेबुलाल शर्मा, चंदादेवी राधेश्याम शर्मा, सुशिला प्रल्हादराय शर्मा, अर्चना रविंद्र लध्दड, शिल्पा अरुण जैस्वाल, सोनल मनमोहन शर्मा, अर्चना मुकुंद वैष्णव, कुंदा पाटील यांनी बारा ज्योतीर्लिंगाचे पुजन व रुद्राभिषेक केला.