वहिवाटीचा रस्ता अडवला ;  शाळकरी मुलांसह शेतकर्‍यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण 

माहोरा  : येवता शिवारातील   वहीवाटीचा बंद रस्ता खुला करण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी मंगळवार,8 जुलै रोजी जाफराबाद येथील तहसिल कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. अखेर त्यांच्या या आंदोलनांची दखल तहसिलदार सारिका भगत यांना घ्यावी लागली. वहिवाटीचा रस्ता खुला करून देऊ, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हे उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.  

गणेश पगारे/ माहोरा  : येवता शिवारातील   वहीवाटीचा बंद रस्ता खुला करण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांनी मंगळवार,8 जुलै रोजी जाफराबाद येथील तहसिल कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. अखेर त्यांच्या या आंदोलनांची दखल तहसिलदार सारिका भगत यांना घ्यावी लागली. वहिवाटीचा रस्ता खुला करून देऊ, असे आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हे उपोषण आंदोलन स्थगित करण्यात आले.  

     येवता शिवारातील गट क्रमांक 33 मधून शेतामध्ये जाणारा वहिवाटीचा रस्ता एका शेतकर्‍याने अडवून धरला आहे.  यामुळे शेतकरी आणि शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहेत.  याबाबत 15 मे रोजी तहसीलदारांकडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे.  तहसीलदारांनी याबाबत शेतकर्‍यांच्या बाजूने निकाल दिला आहे.  मात्र आजपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही.  त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी विद्यार्थ्यांसह मंगळवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण आंदोलन सुरू केले.  अखेर तहसीलदार सारिका भगत यांनी याबाबत आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण आंदोलन थांबवण्यात आले.उद्याच्या कारवाईकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

 उद्या संयुक्त कारवाई 

 तहसिलदार सारिका भगत यांनी या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया देत सांगितले की, रस्ता खुला करण्यासाठी बुधवार, 9 जुलै रोजी महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »