अलिगढ : क्रिकेटर रिंकू सिंहची फेसबुक आयडी हॅक झाली आहे. सायबर चोरांनी रिंकूची आयडी बदलून त्यातून होणारी कमाईही त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली.

अलिगढ : क्रिकेटर रिंकू सिंहची फेसबुक आयडी हॅक झाली आहे. सायबर चोरांनी रिंकूची आयडी बदलून त्यातून होणारी कमाईही त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली. रिंकूच्या भावाने तक्रार केल्यानंतर सायबर क्राईम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रिंकूचा भाऊ सोनू याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, रिंकू सिंहच्या फेसबुक पेजवर १.६ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो गेल्या बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आणि टी-२० विश्वचषकाच्या तयारीमध्ये व्यस्त होता. यामुळे तो सोशल मीडिया अकाउंटवर लक्ष देऊ शकला नाही.
४ फेब्रुवारी रोजी त्याने आयडी उघडण्याचा प्रयत्न केला असता, पासवर्ड चुकीचा असल्याचे दाखवत होते. आयडी ऍक्सेस करण्यातही अडचण येत होती. तेव्हा त्याने आपला भाऊ सोनू याला सर्व काही सांगितले. सोनूने ५ फेब्रुवारी रोजी एसएसपींची भेट घेऊन तक्रार दिली. एसएसपींच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ओझोन सिटी गोल्ड स्टेट येथील रहिवासी रिंकू सिंगचा भाऊ सोनू सिंगने सांगितले की, रिंकू सिंग सध्या मुंबईत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० विश्वचषकाचा सराव सामना खेळून परतला आहे. त्याने ४ फेब्रुवारी रोजी आपले फेसबुक अकाउंट लॉग इन केले. खूप प्रयत्न करूनही आयडी उघडली नाही. त्यांची ईमेल आयडी बदलली असल्याचे समजले.
