विनोद सावळे/ बुलढाणा : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

विनोद सावळे/ बुलढाणा : राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबरच वैयक्तिक शेततळे, शेततळ्याचे अस्तरीकरण, हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरणाला राज्य शासनाने ग्रीन सिग्नल दिला आहे. शासनाकडून शाश्वत कृषी सिंचनावर भर देण्यात येत असून त्याअनुषंगाने राज्यातील 706 वैयक्ति शेततळ्यांना अनुदानाची संजीवनी मिळणार आहे.
वित्त विभागामार्फत 2024-25 साठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या 400 कोटीच्या (सूक्ष्म सिंचनाकरिता पूरक अनुदान घटकासाठी 300 कोटी, वैयक्तिक शेततळे घटकासाठी 100 कोटी) निधीस मान्यता देण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त मागणी व सद्य:स्थितीत असलेल्या प्रलंबित दायित्वाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांकरिता 529.50 लक्ष निधी वितरीत करण्यास शासनाच्या कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.
शेततळ्यात पुणे विभाग आघाडीवर
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे घेण्यामध्ये राज्यात पुणे विभाग आघाडीवर आहे. पुणे विभाग 198 वैयक्तिक शेततळे त्याखालोखाल नागपूर विभागात 165 व छत्रपती संभाजीनगर 164 वैयक्तिक शेततळे आहेत.
विभागनिहाय शेततळे व वितरीत निधी
विभाग शेततळे निधी (लाखात)
कोकण, 16, 12.00
नाशिक, 122, 91.50
पुणे, 198, 148.50
कोल्हापूर, 15, 11.25
छ. संभाजीनगर, 164, 123.00
लातुर, 5, 3.75
अमरावती, 21, 15.75
नागपूर, 165, 123.75
एकूण, 706, 529 .50