कन्नड : गौताळा औट्रम घाट अभयारण्याजवळील तलावात माशाच्या जाळ्यात अडकलेल्या अजगाराची कन्नडचे सर्पमित्र अनिल आसाराम शिरसे यांनी सुरक्षितरित्या मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी सुटका केली.

कन्नड : गौताळा औट्रम घाट अभयारण्याजवळील तलावात माशाच्या जाळ्यात अडकलेल्या अजगाराची कन्नडचे सर्पमित्र अनिल आसाराम शिरसे यांनी सुरक्षितरित्या मंगळवार, 5 ऑगस्ट रोजी सुटका केली.
औट्रम घाटातील तलावात मासेमारी करणाऱ्याच्या जाळ्यात एक अजगर अडकला असल्याची माहिती सर्पमित्र अनिल शिरसे यांना मिळाली. अनिल शिरसे, वन परिमंडळ अधिकारी एस.एस. घोरपडे, वनरक्षक सुरेंद्र सोनार यांनी घटनास्थळी धाव घेवून माशाच्या जाळ्यात अडकलेल्या अजगाराची जाळे कापून सुटका केली. त्यानंतर सहाय्यक वन्यजीव रक्षक सचिन शिंदे, विकास बनकर, मयूर हसरवाल, मच्छीमार लाडे यांच्या उपस्थितीत अजगरास नैसर्गिक वातावरणात सोडण्यात आले.