Rajasthan Bus Accident: राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी झालेल्या एका रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
जयपूर : राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात मंगळवारी दुपारी झालेल्या एका रस्ते अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले.
जिल्हा पोलिस अधीक्षक भुवन भूषण यादव यांनी सांगितले की, लक्ष्मणगढ येथे एका कल्व्हर्टला बस धडकली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, जखमींना लक्ष्मणगड आणि सीकर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मणगड येथील कल्व्हर्टजवळ हा अपघात झाला. सालासरहून लक्ष्मणगडकडे येणारी खासगी बस कल्व्हर्टला धडकली.