श्री मत्स्योदरी देवीला राहुल  खरात यांनी केले एक तोळे सोने अर्पण 

अंबड : शहरातील शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते राहुल खरात यांच्या पत्नी दर्शना राहुल खरात यांनी काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री मत्स्योदरी देवीला १ तोळे सोने अर्पण करण्याचा नवस केला होता. दरम्यान शनिवार, २० सप्टेंबर रोजी त्यांनी आपल्या कुटुंबियांसह  नवसपूर्ती केली. 

यावेळी संस्थानच्यावतीने अध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी मत्स्योदरी देवीची प्रतिमा देवून खरात कुटुंबियांचा सन्मान केला.मत्स्योदरी देवीच्या नवरात्री महोत्सवास सोमवार, २२ सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. खरात कुटुंबियांनी मनोभावे दर्शन घेवून १ तोळे सोने अर्पण करण्याबाबत संस्थान अध्यक्ष विजय चव्हाण यांना म्हटले, तुमचा सोने अर्पण करण्याचा नवसच आहे. तर १ तोळ्याऐवजी १ ग्राम सोने अर्पण करा. आणि उर्वरित रकमेतून संस्थानला आवश्यक असणाऱ्या वस्तू घेवून द्या. असे सुचविले. यावर खरात कुटुंबियांनी १ ग्राम सोने अर्पण करून उर्वरित रकमेतून संस्थानला आवश्यक असणाऱ्या वस्तू घेवून देण्याबाबत  होकार दिला. 

 संस्थानच्यावतीने अध्यक्ष तहसीलदार विजय चव्हाण यांनी खरात कुटुंबियांना मत्स्योदरी देवीची प्रतिमा भेट देवून आभार व्यक्त केले. यावेळी बबिता वसंतराव खरात, राहुल व्ही. खरात, दर्शना राहुल खरात, राजयोग खरात, विरा गुरुचल, रित्विक खरात यांच्यासह संस्थानचे व्यवस्थापक कैलास शिंदे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »