पर्यटकांसह व्यावसायीकांच्या सेवेसाठी ‘प्राइड इलाइट’ हॉटेल सज्ज: सत्यन जैन यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

छत्रपती संभाजीनगर :  पर्यटनाची राजधानी व औद्योगिक हब असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राइड हॉटेल्स ग्रुपने नवीन हॉटेल सुरू केले आहे. उल्लेखनीय म्हणजे चिकलठाणा विमानतळापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर हॉटेल आहे. यामुळे व्यावसायिक व पर्यटन प्रवाशांसाठी मल्टी-कुइझीन रेस्टॉरंट व राहण्याची तसेच बैंक्वेट हॉल कॉर्पोरेट कॉन्फरन्सची मोठी सुविधा निर्माण झाली असल्याची माहिती प्राईड ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यन जैन यांनी बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

प्राइड हॉटेल्स ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यन जैन यांनी पुढे सांगितले की, ‘प्राइड इलाइट छत्रपती संभाजीनगर’ हे प्राइड ग्रुपचे महाराष्ट्रातील चौथे आणि ‘प्राइड इलाइट’ ब्रँडखालील सातवे हॉटेल आहे. ३,५०० चौरस फूट क्षेत्रफळाचा विशाल बैंक्वेट हॉल आहे. येथे देश-विदेशातील खाद्यपदार्थांच्या अस्सल चवदार मेजवानीसाठी ‘कासाब्लांका’, ‘अटलांटिस’ व ‘एरोसिटी आयएक्सयू रुफटॉफ लाउंज’ असे तीन रेस्टॉरंट्स आहेत. हॉटेलचे महाव्यवस्थापक मानस मोहंती यांनी सांगितले की, हे नवीन हॉटेल व्यावसायिक व पर्यटक या दोन्ही प्रकारच्या पाहुण्यांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी रिचमंड ट्रेडिंग कंपनीचे राजू मनकानी, प्राईड ग्रुपचेकार्यकारी संचालक अतुल उपाध्याय आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »