शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षक भारती नेहमीच तत्पर : सुरेश देवकर : वाशिम जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रमोद हुंबाड 

वाशिम : शिक्षकांच्या समस्यांसाठी लढा देणारी एकमेव संघटना म्हणजे शिक्षक भारती असून, येणाऱ्या काळातही आम्ही संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने कार्यरत राहू, असा विश्वास शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी शिक्षकांना दिला. 

वाशिम : शिक्षकांच्या समस्यांसाठी लढा देणारी एकमेव संघटना म्हणजे शिक्षक भारती असून, येणाऱ्या काळातही आम्ही संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परतेने कार्यरत राहू, असा विश्वास शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक महाभूमिचे मुख्य संपादक सुरेश देवकर यांनी शिक्षकांना दिला. 

वाशिम येथे आयोजित शिक्षक भारतीच्या वाशिम जिल्हा व तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रसंगी अशोक मुंढे, नंदकिशोर शिंदे, सचिन लोढे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रसंगी शिक्षक भारतीची वाशिम जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. यावेळी वाशिम जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षस्थानी प्रमोद हुंबाड यांची नियुक्त करण्यात आली. उपाध्यक्षपदी संतोष जाधव, सचिवपदी विनोद जमधाडे, संघटक पदी प्रा. संजयकुमार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. यासह तालुका कार्यकारीणी देखील गठित करण्यात आली आहे. यामध्ये रिसोड तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रा. परशुराम नरवाडे, उपाध्यक्षपदी प्रा. पंडीत देशमुख, संघटक पदी निलेश मोरे, प्रभाकर सरकटे, श्याम मोरे, प्रसिद्धी प्रमुख पदी शिवाजी राजे यांनी नियुक्ती करण्यात आली. कारंजा तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रा. विनय चव्हाण, संघटक पदी प्रा. नंदू भगत, प्रसिद्धी प्रमुख पदी प्रा. सुनील राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. मालेगाव तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी संजय लांडकर, उपाध्यक्षपदी राहुल राऊत, तर सचिव पदी अनिल घुगे यांची नियुक्ती करण्यात आली. मानोरा तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अमोल खरोडे, उपाध्यक्षपदी गणेश चव्हाण, सचिव पदी राहुल पडधने, प्रसिद्धी प्रमुख पदी आर. बी. ब्राम्हण, संघटक पदी संतोष मनवर, अनिल पडघान आणि भालचंद्र कटके यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »