खामगाव : मल्हार महासंघ क्रांतीकारी व संघर्षमय सामाजिक संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी फुलंब्री तालुक्यातील उमरावती येथील प्रकाश भीमराव खिल्लारे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र नुकतेच मल्हार महासंघ क्रांतीकारी व संघर्षमय सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कोळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

मल्हार महासंघ क्रांतीकारी व संघर्षमय सामाजिक संघटनेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी प्रकाश खिल्लारे यांच्या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कोळेकर यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संतोष थोरात, प्रदेश सरचिटणीस अनिल भालेकर यांची उपस्थिती होती. मल्हार महासंघ क्रांतीकारी व संघर्षमय सामाजिक संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश खिल्लारे यांची निवड झाल्याबद्दल रखमाजी जाधव, अजिनाथ खमाट, दत्तु काळे, राहुल सोनवणे, संजय पांडूरंग खमाट, उपसरपंच असलम पठाण, पत्रकार दादासाहेब काळे, अजिनाथ खिल्लारे, नामदेव पायगव्हाण आदींनी त्यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, मल्हार महासंघ क्रांतीकारी व संघर्षमय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजाची सेवा करुन मल्हार महासंघाच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन करुन संघटनेची बांधणी करण्यात येईल. तसेच समाजाला एकत्रित करुन त्यांचे प्रश्न शासनस्तरावर मांडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश खिल्लारे यांनी दिले आहे.