अकोलादेव : बटाट्यावरील तणनाशक फवारणी केल्यामुळे चार एकरांवरील संपूर्ण पीक जळाल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना जाफ्राबाद तालुक्यातील अकोला देव तसेच पापळ येथे घडली. या प्रकरणी संबधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

या संदर्भात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे की, शेतकरी शिवशंकर सवडे यांनी एक एकर क्षेत्रावर बटाटा पिकाची लागवड केली होती. शेतकरी सवडे यांनी कावेरी कृषी केंद्र या दुकानातून बटाटा पिकावरील तणनाशक खरेदी केले होते. या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर संपूर्ण पीक जळून गेले. यामुळे सदोष तणनाशकाची विक्री करणारे व्यावसायिक व उत्पादन करणाऱ्या कंपनीवर कार्यवाही करून झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जळालेल्या पिकाचा पंचनामा करावा, असेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पापळ शिवारातील परमेश्वर राऊत या शेतकऱ्याच्या शेतातील तीन एकर बटाट्याचे तणनाशकामुळे नुकसान झाले आहे. चुकीच्या तणनाशकाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
– प्रमाणपेक्षा जास्तीचे औषध फवारणी
हे तणनाशक इंडोगल्फ कंपनीचे असून या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविले आहे. त्यानुसार त्यांनी सदर शेताची पाहणी करून शेतकऱ्यांनी जास्तीचे औषध फवारल्याचे सांगितले. दरम्यान कंपनीने निश्चित केलेल्या प्रमाणानुसारच आपण एक एकर शेतासाठीचे तणनाशक दिले होते.
ज्ञानेश्वर फिरके, तणनाशक विक्रेता.