Poor condition of Ratanwadi to Gavha road : साहेब आचार सहिंता संपली, रस्त्याचे काम कधी सुरु करता

Poor condition of Ratanwadi to Gavha road

Poor condition of Ratanwadi to Gavha road: सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय अंतर्गत रतनवाडी ते गव्हा रस्त्याच्या कामाचे मजबुतीकरण सह डांबरीकरणाचे काम गेल्या एक वर्षा पूर्वी मंजूर झाले असून ठीक ठिकाणी रस्त्यावर गिट्टी टाकण्यात आली आचार सहिंता सुद्धा संपली आता साहेब काम कधी सुरु करणार असा सवाल वाहन चालकाकडून व्यक्त होत आहे.

Poor condition of Ratanwadi to Gavha road

मानोरा : सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय अंतर्गत रतनवाडी ते गव्हा रस्त्याच्या कामाचे मजबुतीकरण सह डांबरीकरणाचे काम गेल्या एक वर्षा पूर्वी मंजूर झाले असून ठीक ठिकाणी रस्त्यावर गिट्टी टाकण्यात आली आचार सहिंता सुद्धा संपली आता साहेब काम कधी सुरु करणार असा सवाल वाहन चालकाकडून उपस्थित केल्या जात आहे.
मानोरा हा तालुका मुख्यालय असून ढोनी, पाळोदी, उज्ज्वलनगर, रतनवाडी, फुलउमरी, सोमेश्वर नगर, उमरी बु, उमरी खुर्द, शेंदोना सह पुसद कडून मधल्या मार्गाने येणाऱ्या नागरिकांना रतनवाडी मार्गे मानोराकडे जाण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहणाची वर्दळ असते मात्र ठीक ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून वाहन चालवीताना खूप मोठी कसरत करावी लागते. अनेक वेळा दुचाकी खड्यात आदळून वाहणाचा अपघात झाल्याने गंबीर दुखापत झाली तर वाहणाचे सुद्धा नुकसान होत आहे. नागरिकांना खड्यातून वाहन चालवीत असल्याने मणक्याचे व कंबरेचे आजार जडले आहे. सदर रस्ता मजबुती करण व डांबिरीकरण करिता निधी मंजूर असून एका कंत्राकदार यांना एक वर्षा पूर्वी काम देण्यात आले मात्र सदर कंत्राकदार याने सहा महिण्या पूर्वी रस्त्यावर गिट्टी आणून टाकली मात्र कामाला अद्याप सुरवात झाली नाही. मधातल्या काळात विधानसभा निवडणूक आचारसंहिताचे कारण समोर केले. आता आचार सहिंता उठली आता तरी कामाला सुरवात करावी. कामाला विलंब लावणाऱ्या कंत्राकदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे कामाला विलंब करीत असल्याने त्याचेंवर दंड आकारणी करावी असी मागणी सुद्धा या परिसरातील नागरिकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »