Petition filed in court against Abdul Sattar : महायुतीचे सरकार येत असताना मागील दोन-तीन सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांच्या मंत्री पदालाच आता विरोध होत आहे. याशिवाय त्यांच्यासाठी आणखी एक अडचणीची बाब समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात खोटी व भ्रामक माहिती दिल्याचा आरोप सिल्लोड दिवाणी न्यायालयात दाखलयाचिकेद्वारे केला आहे.
छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे सरकार येत असताना मागील दोन-तीन सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार यांच्या मंत्री पदालाच आता विरोध होत आहे. याशिवाय त्यांच्यासाठी आणखी एक अडचणीची बाब समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात खोटी व भ्रामक माहिती दिल्याचा आरोप सिल्लोड दिवाणी न्यायालयात दाखलयाचिकेद्वारे केला आहे. विधानसभेच्या सिल्लोड मतदारसंघातून आमदार झालेल्या अब्दुल सत्तार यांच्या विरोधात शुक्रवारी (२९ नोव्हेंबर) महेश शंकर पेल्ली यांनी सिल्लोड येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे .
सिल्लोडमध्ये शिंदे गटाचे उमेदवार अब्दुल सत्तार आणि ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यात प्रमुख लढत झाली. निवडणुकीत २ हजार ४२० अधिक मते घेऊन सत्तार विजयी झाले. ही निवडणूक लढण्यासाठी सत्तार यांनी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करून छाननीदरम्यानच महेश शंकर पेल्ली यांनी आक्षेप नोंदवला होता. तशी तक्रार त्यांनी निवडणूक निर्वाचन अधिकारी लतीफ पठाण यांच्यासह निवडणूक आयोगाकडे ऑनलाइन केली होती.
मात्र पठाण यांनी या प्रकरणातील पेल्ली यांचा आक्षेप फेटाळला होता. त्यामुळे आता शंकरपेल्ली व पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी आ. सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेत निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ इब्राहिम पठाण यांनाही सत्तारांसोबत प्रतिवादी केले आहे. विशेष म्हणजे राज्यात शिवसेना – भजपाचे सरकार येत असताना आ. सत्तार यांच्या सह अन्य चार माजी मंत्र्यांच्या नव्याने मंत्री होण्याला विरोध केला जात आहे. आता सिल्लोड दिवाणी न्यायालयात दाखल याचिकेमुळे सत्तार याच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे याप्रकरणी न्यायालय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उमेदवार हे सातत्याने प्रत्येक निवडणुकीत खोटी माहिती देऊन निवडणूक लढवत असून, त्यामुळे मतदारांची फसवणूक होत असल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.
१२ डिसेंबर पर्यंत बाजू मांडण्याचे आदेश
आमदार निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी आ. अब्दुल सत्तार यांची सीआयडी चौकशी करण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली व माजी भाजप नालकाध्यक्ष दिलीप टाणेकर यांनी दाखल केली तालुकाध्यक्ष दिलीप दाणेकर यांनी दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना ८ आठवड्यांत कारवाईचे करण्याचे आदेश खंडपीठाने मार्च २०२४ मध्ये दिले होते. त्यानंतरही कारवाई केली नसल्याने अवमान याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे खंडपीठाने आता गृह विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावली असून, १२ डिसेंबरला म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.