people are engaged in election training: भोकरदन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे पाहिले प्रशिक्षणानंतर शनिवारी ६ एप्रिल रोजी दुसऱ्या प्रशिक्षण दुसऱ्या सत्रात पार पडले. या प्रशिक्षणास १ हजार ९३४ कर्मचारी हजर होते. तर २६ कर्मचारी गैरहजर राहिले होते. प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांसाठी भोजन व्यवस्था न करता केवळ चहा, नाश्ता देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले.
भोकरदन (जि. जालना) : जालना लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात म्हणजे १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानुषंगाने भोकरदन विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे पाहिले प्रशिक्षणानंतर शनिवारी ६ एप्रिल रोजी दुसऱ्या प्रशिक्षण दुसऱ्या सत्रात पार पडले. या प्रशिक्षणास १ हजार ९३४ कर्मचारी हजर होते. तर २६ कर्मचारी गैरहजर राहिले होते. प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांसाठी भोजन व्यवस्था न करता केवळ चहा, नाश्ता देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर उमटल्याचे दिसून आले.
भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा जालना लोकसभा मतदार संघात असल्याने चौथ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेसाठी भोकरदन निवडणूक विभाग वेगाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे.
6 एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीचे दुसरे प्रशिक्षण भोकरदन शहरातील समृध्दी लॉन्स कार्यालयात दोन सत्रात घेण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन हाताळणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रशिक्षण हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दयानंद जगताप, भोकरदनचे संतोष बनकर, जाफ्राबादच्या तहसीलदार सारिका भगत यांनी दिले. या प्रशिक्षणास १ हजार ९३४ कर्मचारी उपस्थित होते, तर २६ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली. या प्रशिक्षणाला २६ कर्मचारी गैरहजर राहिले. या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. जगताप यांनी दिली.
भोकरदन विधानसभा मतदारसंघात एकूण ३२९ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी भोकरदन तालुक्यात १८० तर जाफ्राबादमध्ये १४९ मतदान केंद्र आहेत. दरम्यान भोकरदन येथील समृद्धी लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित निवडणूक प्रशिक्षणात पहिल्या सत्रात सकाळी ९ ते २ चहा व उपमा तर दुपारी २ ते ५ वाजताच्या दुसऱ्या सत्रात चहा आणि खिचडी असा केवळ नाश्ताच देण्यात आला. भोजन देण्यात आले नसल्यामुळे दुपारचे जेवण घेणाऱ्या मधुमेही किंवा इतर प्रकारचे रुग्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागला, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने दिली.
इलेक्शन ड्युटी नको म्हणून कर्मचाऱ्यांचे अर्ज
काही निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे ६ एप्रिल रोजी भोकरदन येथील समृद्धी लॉन्समध्ये २ सत्रात घेण्यात आले. त्यामध्ये ईव्हीएम मशीन यंत्र हाताळणीचे प्रात्यक्षिक करण्यात आले. विशेष म्हणजे निवडणूक कर्तव्यात सुट मिळावी यासाठी जवळपास १५ हुन अधिक कर्मचाऱ्यांनी विविध प्रकारचे आजार, शत्रक्रिया व अन्य वैद्यकीय कारणे दर्शवित इलेक्शन ड्युटी रद्द करावी असे अर्ज निवडणूक विभागाकडे दिल्याची माहिती आहे.
पहिल्या प्रशिक्षणास 128 कर्मचारी गैरहजर
सहा एप्रिल रोजी पार पडलेल्या प्रशिक्षणाआधी १६ मार्च रोजी समृद्धी लॉन्स येथे २ सत्रात पार पडले. या प्रशिक्षणास २ हजार ८२ कर्मचारी हजर होते तर १२८ कर्मचारी गैरहजर राहिले होते.