देशभक्तीच्या शिवपिंडीला कर्तव्य निष्ठेचा ‘अभिषेक’; लग्नाला दोन दिवस उलटले अन् तिसऱ्या दिवशी युद्धभूमीसाठी रवाना

केळवद : ‘देशभक्ती हीच खरी शिवपिंडी आहे’, म्हणजे देशासाठी प्रेम आणि निष्ठा हेच खरे धार्मिकता आहे, या वाक्याचा प्रत्यय केळवद येथील अभिषेक मधुकर भोलाने या जवानाच्या रूपाने मिळाला आहे. लग्नाला दोन दिवस उलटत नाही तोच, अभिषेकला देशाच्या कर्तव्याचे बोलावणे आले.

केळवद : ‘देशभक्ती हीच खरी शिवपिंडी आहे’, म्हणजे देशासाठी प्रेम आणि निष्ठा हेच खरे धार्मिकता आहे, या वाक्याचा प्रत्यय केळवद येथील अभिषेक मधुकर भोलाने या जवानाच्या रूपाने मिळाला आहे. लग्नाला दोन दिवस उलटत नाही तोच, अभिषेकला देशाच्या कर्तव्याचे बोलावणे आले. सध्या देशात भारत- पाकिस्तानचे युद्ध सुरू असल्याने अभिषेक भोलाने आपला नवा संसार सुरू करण्याआधीच देशसेवेसाठी रुजू होत आहे.

  चिखली तालुक्यातील किन्होळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अभिषेक मधुकर भोलाने यांचा विवाह मयूरी प्रल्हाद वडणकर यांच्याशी झाला. लग्न समारंभ सुरु असतानाच अभिषेक यांना फोनद्वारे बोलावणे आले. अरुणाचल प्रदेश येथील तवंग येथे आपल्या कर्तव्यावर रुजू होण्याचे त्यांना आदेश मिळाले.  अभिषेक भोलाने हे सशस्त्र सीमा दलातील जवान आहेत. जवळपास तीन चारवर्षांपूर्वी ते सैन्यदलात भरती झाले होते.  दरम्यान, वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली आणि भारत पाकिस्तानमध्ये तनाव वाढला.  अशा परिस्थितीत मिळालेल्या आदेशाचा यत्किंचितही विचार न करता सेवेसाठी रुजू होण्याचा निर्णय अभिषेक यांनी घेतला. त्यांच्या हा स्वागतार्ह निर्णय  कर्तव्य निष्ठेचा ‘अभिषेक’ ठरला आहे.

बुलढाण्याचे मुकेश काकडेही रवाना

केळवदचे अभिषेक मधुकर भोलाने आणि बुलढाण्याचे मुकेश नामदेव काकडे हे दोघे जवान देशसेवेच्या आवाहनावर निघाले असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि संपूर्ण देशाच्या सदिच्छा त्यांच्या सोबत आहेत. अभिषेक भोलाने यांनी नुकतेच लग्न करून थेट सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला, ही त्यांची देशभक्ती प्रेरणादायी आहे. या दोघा जवानांना शुभेच्छा देताना “तुम्ही जेवढे आतंकवादी संपवाल, प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देईन,” असे स्पष्टपणे सांगून, “तुम्ही सीमेवर लढा, आम्ही अंतर्गत शत्रूंशी लढू,”आ. विश्वास  आ. गायकवाड यांनी सत्कार कार्यक्रमात दिला. याप्रसंगी युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, पृथ्वीराज संजय गायकवाड आणि धर्मवीर युथ फाउंडेशन तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »