Chhatrapati Sambhajinagar Crime News : कॉटन यार्नचा माल मागवून तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरातच्या व्यापाऱ्यावर सिडको एम. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : कॉटन यार्नचा माल मागवून तब्बल १ कोटी ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुजरातच्या व्यापाऱ्यावर सिडको एम. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भरतकुमार पुरुषोत्तमदास पटेल (रा. निळकंठ रेसिडेन्सी, नरोडा रोड अहमदाबाद, गुजरात) असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी संजय त्रीलोकचंद अग्रवाल (रा. चिकलठाणा एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार संजय अग्रवाल यांचा कॉटन यार्नचा व्यवसाय आहे. चिकलठाणा परिसरात त्यांची फॅक्टरी आहे. आरोपी भरतकुमार पुरुषोत्तमदास पटेल यांच्याशी ते कॉटनचा व्यवसाय करतात. आरोपी भरत कुमार पटेल यांच्या मागणीप्रमाणे १८ जुलै २०१९ ते ५ ऑगस्ट २०१९ या कालावधीत फिर्यादींनी ५६ लाख ८१ हजार रुपयांचा कॉटन यार्न पाठविला. मात्र आरोपींनी केवळ एकाच बिलाची रक्कम १३ लाख ३२ हजार ३५१ रुपयाची नोंद असलेले व खोटे बनावट लेझर तयार करून त्यावर खोट्या नोंदी घेतल्या. तसेच पाठविलेला माल इतरांना विक्री करून त्या मालाचे पैसे स्वतः घेतले. आरोपींनी जीएसटीचा परतावा तसेच मुद्दल रकमेवरील व्याज असा अशी १ कोटी ४ लाख ८२ हजार ६४७ रुपयाची आर्थिक फसवणूक केली. अशी फिर्याद सिडको एम पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गौतम पातारे हे करीत आहेत.