महाशिवरात्रीला घृष्णेश्वराचे गाभारा दर्शन बंद: भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे संस्थानचा निर्णय

खुलताबाद :  वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. दरवर्षी वाढती गर्दी लक्षात घेता यंदा महाशिवरात्रीला श्री घृष्णेश्वरांचे हात लावून व डोके टेकून दर्शन बंद ठेवण्यात येणार असून, गाभाऱ्याच्या दरवाजातून घृष्णेश्वराचे दर्शन घ्यावे लागणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे उपाध्यक्ष योगेश टापरे यांनी बुधवार, 4 फेब्रुवारी रोजी दिली.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपस्थितीत मंगळवार, 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त वेरूळ येथे मोठी यात्रा भरते, तसेच देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिर गाभारा दर्शन सुरू ठेवल्यास दर्शनासाठी ४ ते ५ तास लागतात व भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन गाभाऱ्याच्या दरवाजातून मुखदर्शनाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, भाविकांना श्री घृष्णेश्वराचा जलाभिषेक बाहेरून करता येईल, गर्दीचा विचार करता व्हीआयपी दर्शन बंद राहणार आहे. गावातील नागरिकांना आधार कार्ड दाखवून पहाटे सहापर्यंत दर्शन मिळणार असून, येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. दर्शन रांगेतच बाहेर प्रसाद वाटप करता येईल, असे देवस्थान समितीचे उपाध्यक्ष योगेश टोपरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »