खदानीत बुडून माय-लेकीचा मृत्यू; लेकराला वाचवताना आईचा दुर्दैवी अंत

भोकरदन :  तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील पंढरपूरवाडी येथे खदानीतील पाण्यात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शुक्रवार, 20 मार्च रोजी दुपारी घडली. कावेरी दशरथ मोहिते (वय 30) आणि तिची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (वय 12) अशी मृतांची नावे आहेत.

भोकरदन तालुक्यातील पंढरपूर वाडीत हृदयद्रावक घटना; परिसरात शोककळा

भोकरदन :  तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील पंढरपूरवाडी येथे खदानीतील पाण्यात बुडून माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शुक्रवार, 20 मार्च रोजी दुपारी घडली. कावेरी दशरथ मोहिते (वय 30) आणि तिची मुलगी सोनाली दशरथ मोहिते (वय 12) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी मोहिते या आपल्या मुलीसह गावालगत असलेल्या खदानीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी साडेदोन ते तीन वाजेच्या सुमारास कपडे धुत असताना सोनालीचा अचानक तोल जाऊन ती खोल पाण्यात पडली. मुलीचा जीव वाचवण्यासाठी आईने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. मात्र खदानीतील पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अचूक अंदाज न आल्याने दोघींनाही बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तायडे यांच्यासह पोलीस कर्मचारी निलेश खराट, अविनाश मांटे, भरत चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, भोकरदन येथे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे पंढरपूर वाडी परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण गावावर दुःखाचे सावट दाटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »